शाश्वत शेती

 
काटेकोर शेती
नव्या तंत्रांचा वापर करून आणि प्रत्यक्ष शेतांमधली माहिती गोळा करून योग्य वेळी, योग्य ठिकाणी, योग्य अशी गोष्ट करणे याला काटेकोर शेती म्हणतात. जमा केलेल्या माहितीचा वापर बियाण्याची योग्य घनता जास्त नेमकेपणाने ठरवण्यासाठी, खते आणि इतर आदाने किती वापरावीत याचा नेमका अंदाज करण्यासाठी, आणि किती पीक येईल याचे योग्य आडाखे बांधण्यासाठी करता येतो.
कापूस ते ज्वारीपर्यंत पर्यायी शेती पद्धती
रायचूर जिल्ह्यातील नागलापूर गावातील बसवराजप्पा या 38 वर्षीय शेतकर्याने पर्यायी शेती पद्धतीचा वापर करून कशाप्रकारे किफायतशीर उत्पन्न घेतले याची माहिती दिली आहे.
टिकाऊ व चांगली परतफेड देणाऱ्या शेतीच्या पद्धती
तामिळनाडूमधील इरोड जिल्ह्यातील गोबीचेट्टीपालयम गावातील जैविक शेती करणारे शेतकरी श्री. अरूणाचलम् यांच्यामते, टिकाऊ किंवा जैविक शेतीच्या पद्धती स्वस्त असतात, किटक व इतर उपद्रवी प्राण्यांपासून मुक्तता मिळविण्यासाठी प्रभावी असतात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्या सर्वप्रकारे सुरक्षित असतात
पर्यायी शेती पद्धत - कोरडवाहू शेतीत फायदेशीर कापूस पीक
रायचूर जिल्ह्यातील गधर गावातील प्रताप रेड्डी या 3५ वर्षीय शेतकर्याने पर्यायी शेती पद्धतीचा वापर करून कशाप्रकारे कोरडवाहू शेतीत किफायतशीर कापसाचे उत्पन्न घेतले याची माहिती दिली आहे.
विविध राज्यांमध्ये भाताच्या सघन उत्पादनपद्धती
आपल्याकडे भाताच्या सघन (SRI) उत्पादन पद्धतीच्या औपचारिक प्रयोगांची सुरुवात 2002-2003 मध्ये झाली. ही पद्धती प्रामुख्याने आंध्रप्रदेश, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, झारखंड, छत्तीसगड, आणि गुजरातमध्ये अवलंबण्यात येत आहे.
शेतीक्षेत्रातील कीड-व्यवस्थापनास पुनरपरीभाषीत करणे
आंध्रप्रदेशच्याप खम्मम जिल्ह्याचतील पुनुकुला गांवाने पाच वर्षांच्यान काळात (1999-2003) स्व्त:ला कीटकनाशकांच्या वापरापासून प्रयत्नपूर्वक मुक्ता कसे केले त्या ची ही गोष्ट1 आहे. आज हे ग्रामीण लोक रासायनिक कीटकनाशकांचा वापर कदापि करीत नाहीत – ते आपल्या् तसेच इतरही जिल्ह्यांतील शेतकर्‍यांना ह्याच मार्गाने जाऊन आपले जीवन सुधारण्या्ची प्रेरणा देत आहेत. पंचायतीने कीटकनाशक-मुक्त राहण्यानचा संकल्प सोडला आहे.
तांदुळाच्‍या कादिरमंगलम् जातीचे वर्धन
तांदुळाच्‍या कादिरमंगलम् जातीचा, तामिळनाडु राज्‍याच्‍या कावेरी खोरे क्षेत्रातील गावांतील श्री. एस. गोपाल यांच्‍याद्वारे विकसित प्रणालीचा कशा प्रकारे वापर करण्‍यात आला आहे याची माहिती यामध्ये दिली आहे.
धनपती सप्कोता पारितोषिक विजेता शेतकरी, सिक्कीम
गंगटोक येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय पुष्प प्रदर्शन-महोत्सवातील भाजीपाला उत्पादन स्पर्धेत सिक्कीमच्या धनपती सप्कोता या शेतकऱ्याने दीड लाख रुपयांचे रोख पारितोषिक पटकावले. पूर्व सिक्कीमच्या या शेतकऱ्याला नुकताच मुख्यमंत्र्याच्या हस्ते रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. आसामच्या छोटा सिंग्ताम येथील या शेतकऱ्याने आपल्या शेतीत दहा प्रकारचे उत्पादन घेऊन दाखवले आहे.
पट्टी पिके – कोरड्या(शुष्क) जमिनीच्या शेतकर्‍यांसाठी आशेचा किरण
चित्रदुर्ग आणि बेल्लारी जिल्ह्या तील चिन्नायगरी आणि उप्पयरहाला ही कोरडी क्षेत्रे कर्नाटकाच्या शुष्कच पट्ट्यात आहेत. ह्याखेरीज, ह्या क्षेत्रांमध्ये् वारंवार दुष्काळ पडतात. तेंव्हा अशा जमिनीत पट्टी पिके कशी उपयोगी आहेत याची माहिती यामध्ये दिली आहे.
पारंपारिक ज्ञानाचा उपयोग करून दुष्काळावर केली मात
केरळमधल्या पलक्क्ड जिल्ह्यातलं एरिमायूर खेडं. त्याजवळच्या पदयेत्ती वाडीची ही कथा. भात हे तिथलं मुख्य पीक. ह्या वाडीवर ६९ कुटुंबं राहतात आणि सुमारे १०० एकरांवर भातखाचरं आहेत. ह्या वाडीवर गेल्या वर्षीच्या ऑगस्टपासून तीन वर्षांसाठीचा कृषि-जैववैविध्य पुर्नभरण आणि सेंद्रीय खेडे संकल्पनेवर आधारित एक प्रयोग सुरू झाला आहे. केरळ स्टेट बायोडायवर्सिटी बोर्ड आणि थनाल ह्या त्रिवेंद्रममधल्या स्वयंसेवी संघटनेच्या संयुक्त प्रयत्नानं हा प्रकल्प राबवला जातो आहे
प्लास्टिकच्या वाया गेलेल्या बाटल्यांमधून रोपवाटिकेची निर्मिती
२ लिटर क्षमतेच्या प्लास्टिकच्या वाया गेलेल्या बाटल्या आडव्या म्हणजे लांबीच्या दिशेत कापून रोपवाटिकेत भाताची रोपं करण्यासाठी वाफा म्हणून वापरल्या जातात.
बनमाली दास, एक एकात्मिक शेतकरी
बनमाली दास पश्चिम बंगालच्या दक्षिण २४ परगणाच्या गयाधाम गांवी रहतो. त्याच्या बरोबर एकात्मिक शेती करण्यासाठी ५ सभासद आहेत. त्याने प्रथम ०.२५ एकराच्या जमिनीवर तळे व परसबाग आणि ०.३३ एकराची सखल जमीन अशामधून सुरुवात केली.
बहुस्तरीय तलावाच्या माध्यमातून व समाजाच्या पुढाकारातून वर्षा जलसंचय
छोटा नागपूरचा विस्तार पश्चिम बंगालच्या पश्चिमे पर्यंत आहे. येथे भूभाग लाटांसारखा उंचसखल आहे. डोंगरमाथे पूर्णपणे भकास किंवा कोणत्याही झाडांविना दिसतात. येथील जमीन खडकाळ व दगडी असून ती पाणी धरून ठेवत नाही. वार्षिक पाऊस १२०० ते १४०० मिमि पर्यंत असतो. या विभागात तलावाच्या माध्यमातून व समाजाच्या पुढाकाराने वर्षा जलसंचय कसा केला जातो याचे उदाहरण दिले आहे.
मुलांनी बनवलेल्या बागीच्याने खेड्याचा चेहरामोहराच बदलला
बालिया घाटीचा परिसर पूर आणि दुष्काळ ह्या दोन्ही नैसर्गिक आपत्तींना आलटून-पालटून तोंड देत असतो. तिथल्या गरीब लोकांना निसर्गाच्या ह्या तडाख्यांना तोंड देत कसंबसं जगत राहण्याशिवाय पर्यायच नसतो. परिस्थिती इतकी वाईट आहे की रोजच्या जेवणात भाज्या असतात हे त्यांना जणू माहीतच नाही. २००६ पासून डीआरसीएससी ह्या संस्थेने येथे एनपीएमएससोबत काम सुरू केले आहे. त्यांनी १२-१५ वर्षे वयाच्या मुलांना हाताशी धरून पर्यावरण, नैसर्गिक साधनसंपत्तीशी संबंधित शिक्षण देणे आणि प्रयोगांवर आधारित कार्यक्रम सुरू केले आहेत. २००८ च्या जून महिन्यात ३० मुलांना भाजीपाल्याच्या बियाण्याची २०० पाकिटं वाटण्यात आली. त्यांपैकी १८ मुलांनी आपापली परसबाग फुलवण्यात यश मिळवले.
सामुहिक वनउपज शेती
सामुहिक वनउपज पद्धतीत भुमीहिन किंवा बेराजगोरांसाठी संधी निर्माण केली जाते. त्यांना एकत्र करून त्यांच्या गटा-गटांना उपलब्ध असणाऱ्या पडीक जमीनीचा काही भाग भाडेपट्टीवर काही काळासाठी दिला जातो. या जमिनीवर ते झाडांसह, वेगवेगळ्या प्रकारची झुडपे, वेली, गवत, कंदमुळे, अशा विविध प्रकारच्या वनस्पतींची लागवड करू शकतात.
स्त्रियांसाठी शेतकरी क्षेत्र शाळा – टोमॅटोमधील IPM – FFS चा एक अनुभव
शेतक-यांना सर्वसाधारणतः पर्यावरणाला अनुकूल शेती पद्धतींचा अवलंब करता यावा, आणि विशेषतः उत्पादन खर्च कमी करता येण्यासाठी, पर्यायी शेती पद्धतींमध्ये सक्षम बनविणे आवश्यक आहे ह्यासाठी शेतकरी क्षेत्र शाळा (FFS), एक शोध शिक्षण व्यवस्था सर्वात योग्य अशी सिद्ध झाली आहे.
स्थानीय समुदांयांद्वारे अशेती खाद्य पदार्थांचे संरक्षण
डेक्कन डेवलपमेंट सोसायटी (डीडीएस) ही मेडक जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रांच्या तळागाळात काम करणारी एक स्वयंसेवी संघटना आहे. गेली पंधरा वर्षे अशेती पदार्थाच्या भूमिका पाहण्याचे काम ती करत आहे, जेणेकरुन गरीब ग्रामिणांचे जीवन सुधारेल. ८० पेक्षा जास्त अशेती पदार्थांचे, भाज्या, हिरव्या वनस्पती आणि फळे (बेरीज्), असे वर्गीकरण करण्यात आले आहे.
आशा-वन - एक उपक्रम
पश्चिम बंगालमधल्या बीरभूम मधला राजनगर विभाग, तिथले नारायणपूर हे खेडे. जानेवरी २००८ मध्ये नारायणपूर शिशु समिती म्हणजे एनएसएस स्थापन झाली. लॅटराइट प्रकारची लाल माती असलेली आणि शंभर टक्के नापीक मानली गेलेली ४० एकर जागा एनएसएसने ताब्यात घेतली. ह्या पडीक जमिनीचे पुनरुज्जीवन करण्याच्या ध्यासाने येथे फळझाडं, चराऊ गवत, सरपणासाठीचे वृक्ष लावण्यात आले
एकत्रित कृती मिळवून देते फायदे
भालूकगजर गांव, पश्चिम बंगालच्या पुरुलियामधील काशीपूर गटाच्या पूर्वेकडे वसलेलं आहे. इथली माती खडकाळ वालुकाष्म प्रकारची आहे त्यामुळं त्यात पाणी फारसं साठत नाही. या गावातील शेतक-यांच्या एका गटानं ३००-३५० बिघे जमीन एक-पीक पद्धतीतून दुहेरीच काय तिहेरी पिक पद्धतीत बदलणं शक्य करुन दाखवलं आहे. याची माहिती यामध्ये दिली आहे
सेंद्रिय शेतीकडे वाटचाल
मधुकर किसन मिरगे, रा. मालखेडा, तालुका : भोकरदन, ज़िल्हा : ज़ालना, या शेतकर्याच्या सेंद्रिय शेतीकडे झालेल्या वाटचालीविषयी माहिती दिली आहे.
सेंद्रिय शेतीची यशोगाथा - एक प्रयोगशिल शेतकरी
लोणी, पो. आगरगांव, ता. देवळी , जिल्हा, वर्धा. या गावातील प्रयोगशील शेतकरी श्री. अरूणराव बाळकृष्ण पेटकर यांच्या सेंद्रिय शेतीची यशस्वी वाटचालीविषयी यामध्ये माहिती दिली आहे.
शाश्वत शेती विकाससाठी विडा उचलणारे जय जवान जय किसान शेतकरी मंडळ
जय जवान जय किसान कृषि मंडळास सन 2012 हे वर्ष सकारात्मक कलाटणी देणारे ठरले. या वर्षी इफ्को मार्फत 5 मार्च रोजी गाव पातळीवर मोफत माती परीक्षण शिबीर घेण्यात आले. महाराष्ट्र राज्य कृषि विभाग संचालित धान्य मोहत्सवात सहभागी होत मंडळाने शेवगा,ज्वारी व लसूण ही पिके थेट ग्राहंका साठी उपलब्द करून दिली. तदनंतर 2012 च्या मे महिन्यात जळगाव येतील लडडा अग्रो प्लास्ट यांच्याकडून 40 एकर कापूस पिकच्या क्षेत्रासाठी ठिबक सिंचन संचाचे सामूहिक खरेदी केली.
सघन (SRI) पद्धतीने भात लागवड
या विभागात मौजे पळसुंदे, तालुका अकोले जिल्हा अहमदनगर एसआरआय (सघन) पध्‍दतीने भात लागवड करून भरगोस उत्पादन मिळाल्याबद्दल दिले आहे.
नविन तंत्रज्ञान वापरुन सिताफळ लागवड
वॉटरशेड ऑर्गनायझेशेन ट्रस्ट आणि नाबार्ड संचलीत पार्थ शेतकरी मंडळ सावरगाव म्ह्स्के, तालुका जाफराबाद, जिल्हा जालना यांनी अर्का सहन या नविन विकसित सिताफळाचि लागवड करून विक्रमी उत्पादन कसे घेतले याची माहिती यामध्ये दिली आहे.
सेंद्रिय खत – गांडूळ खत
धोंडू भाऊ लोहकरे, वांजुळशेत, तालुका अकोले जिल्हा अहमदनगर या गावच्या शेतकऱ्याचा गांडूळ खता विषयीचा अनुभव सांगितला आहे.
शेतक-यांनी विक्रीचे काम हाती घेतले – सामूहिक कृतीचे एक उदाहरण
तमिळनाडूमधील कोरडवाहू क्षेत्रातील पेरामबलूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सामुहिक पद्धतीने त्यांच्या शेतमालाची कशा पद्धतीने विक्री करून फायदा मिळाला याची माहिती यामध्ये दिली आहे.
सहा महिने, सहा एकर, 300 टन वांगी, 72 लाख उत्पन्न
जर बाजारपेठेचा अंदाज घेऊन, पिकाचं योग्य नियोजन करुन आणि त्याचं दणकट मार्केटिंग केलं, तर काय होतं, हे दाखवून दिलंय तुळजापूर तालुक्यातील मोर्टा गावच्या शेतकऱ्यानं.
श्री पद्धतीचा अवलंब करुन मिळविले यश
गोरेगाव तालुक्यात प्रथमच मौजा कवलेवाडा या गावात दुबार पीक म्हणजेच श्री पद्धतीचा प्रकल्प राबविण्यात आला.
हळद लागवडीतून सव्‍वा लाखाचे उत्‍पादन
कुडाळ तालुक्‍यातील नारुर येथील संजय मेस्‍त्री या शेतक-याची हळद लागवडीतील यशोगाथा सर्वांना प्रेरणादायी ठरणारी आहे.
शाश्वत विकासासाठी सेंद्रीय शेतीचा ध्यास
अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील जवळा खुर्दचे रमेश मातकर यांनी 1992 मध्ये सेंद्रीय शेती करायला सुरुवात केली. सेंद्रीय पद्धतीने शेती करणे कसे फायद्याचे आहे हे मातकर यांच्या संत्रा बागेला भेट दिल्यावर समजते.
सावरा गाव झाले कंपोष्ट खताचे आगार!
अकोला जिल्हयातील अकोट तालुक्यात सावरा गाव आहे. यावर्षी पशुसंवर्धन विभागाच्या कामधेनू दत्तक ग्राम योजनेत सावरा गावाची निवड झाली, गावातील ग्राम पशुपालक मंडळाच्या सहभागाने गावात 165 शेणखत उर्किडयाचे बेड तयार करण्यात आले आहे.
असोरे गावात निमकर यांचे - नवे तंत्र...विकासाचा मंत्र...
रत्नागिरीच्या गुहागर तालुक्यातील राजेंद्र निमकर या प्रयोगशील शेतकऱ्यांने हापूस आंब्याच्या कलमांची फळधारणा वाढण्यासाठी कॅनोपी तंत्राचा यशस्वी वापर केला आहे.
व्याहाळी येथे मातीतून मोती पिकविण्याची किमया
आत्मविश्वास, कठोर परिश्रम व तंत्रज्ञानाच्या जोरावर मातीतून मोती पिकविण्याची किमया व्याहाळी येथील युवा शेतकऱ्यांने साकार केली आहे.
शेतात केलेल्या मजगीच्या कामामुळे शेती उत्पादन चौपट
कृषि विभागाचा सल्ला व मार्गदर्शन घेतल्याने शेती उत्पादनात भरीव वाढ होते. याची अनुभूती नागपूर जिल्हयातील कामठी तालुक्यातील शिवनी गावच्या सुरेश धोंडबाजी महल्ले या शेतकऱ्याला आले.
टरबूज उत्पादकांचे गांव कोकणा
गोंदिया जिल्हयातील सडकअर्जुनी तालुक्यातील कोकणा/जमी या गावातील शेतकऱ्यांनी आपल्या 210 एकर शेतात टरबूजाची लागवड करुन विक्रमी उत्पादन घेतले आहे.
'शीर'धारेने शेत फुलले
ग्रामविकासासंबंधी विविध पुरस्कार प्राप्त झालेल्या रत्नागिरी जिल्ह्यात गुहागर तालुक्यातील या गावाने शासकीय योजना + लोकसहभाग = विकास हे सूत्र यशस्वीपणे अंमलात आणले आहे.
फुक्कीमेट्याचे शेतकरी वळले नगदी पिकाकडे
गोंदिया जिल्ह्यातील देवरी हा तालुका आदिवासी, दुर्गम व नक्षल प्रभावीत आहे. तालुक्यातील दुर्गम, आदिवासी आणि नक्षल प्रभावीत असलेल्या फुक्कीमेटा गावातील शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनामुळे पारंपारिक धान पिकाला फाटा देवून नगदी पिकाचा मार्ग निवडला. त्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत झाली.
भाजावळ विरहीत उत्तम शेती
चिपळूण तालुक्यातील राजाराम मोरे या रामपुर गावातील शेतकर्याने कोकणातील प्रचलित पद्धतीने म्हणजे 'भाजावळ' न करता भात व नाचणी चे यशस्वी उत्पन्न कसे घेतले याची माहिती यामध्ये दिली आहे.
भरडधान्य विकास कार्यक्रमातून वाढले ज्वारी, बाजरीचे उत्पादन
भरडधान्य विकास कार्यक्रमाद्वारे सुधारित वाण व सुयोग्य व्यवस्थापन केल्यास उत्पादनात होणाऱ्या वाढीविषयी माहिती देण्यात आलेली आहे.
केवळ अडीच एकरच शेती उत्कृष्ट नियोजनातून केली यशस्वी
तुमचे पीक नियोजन चांगले असेल आणि सकारात्मक वृत्ती ठेवून कष्टाने सर्व साध्य करण्याची तयारी असेल, तर छोट्या क्षेत्रातूनही शेती आणि पर्यायाने उत्तम जीवन जगता येते. हेच या लेखातून अनुभवयास मिळते.
खडकाळ माळरानावर साकारला 'मॉडेल शेतीफार्म'
कठोर परिश्रम, जिद्द व योग्य नियोजन यांची योग्य सांगड घातल्याने खडकालाही पाझर फोडता येतो, याची प्रचीती या लेखाद्वारे येते.
कर्नाटकात शेतीमालाची "ऑनलाइन खरेदी-विक्री"
एकात्मिक दृष्य ऑनलाइन विक्री बाजारपेठेद्वारा शेतकरी ऑनलाइन माल विकू शकतात, तसेच त्यांना पेमेंटही ऑनलाइन मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना आपल्या मालाच्या किंमती ठरविता येईल. ज्याद्वारे शेतकऱ्यांना कृषी मालाची योग्य किंमत मिळेल. कृषी मालाच्या विक्रीतील क्रांतीची नुसती सुरवात आहे.
डाळिंब शेतीतून गुणवत्तापूर्ण उत्पादन
अभ्यास, शिस्त, गुणवत्ता या त्रिसूत्रीच्या जोरावर या तरुणाने डाळिंब शेतीतून गुणवत्तापूर्ण उत्पादन व क्षेत्रविस्तार करीत आपल्या उत्कृष्ट व्यवस्थापनाचा नमुनाच सादर केला आहे. हे आपणास या लेखाद्वारे नक्कीच जाणवेल.
सहकार्यातूनच होईल शाश्‍वत शेती विकास
गेल्या २२ वर्षांत भारत आणि इस्रायलमधील व्यापार संबंध अधिक दृढ झाले आहेत. त्यामध्ये कृषी क्षेत्राचा वाटा महत्त्वाचा आहे. दोन्ही देशांतील कृषी संशोधन संस्था तसेच शेतकरी एकमेकांच्या तंत्रज्ञानाची देवाण-घेवाण करताहेत. यातून दोन्ही देशांतील कृषी क्षेत्राच्या विकासाला निश्‍चितपणे चालना मिळालेली आहे. इरिटा मिलर
एकीच्या बळावरच निर्माण केला बाजारपेठेत दबदबा
सातारा जिल्ह्यात गटशेतीची पाळेमुळे चांगलीच रुजली आहेत. त्यामुळेच एकमेकांना आधार, पाठबळ देत येथील शेतकरी विविध पिकांत सुधारित तंत्रज्ञान वापरताना विक्री व्यवस्थाही भक्कम करू लागले आहेत. त्यापैकीच एक असलेल्या कृषक आश्रम गटाच्या "मॉडेल'मुळे शेती शाश्‍वत होण्यास मदत मिळत आहे. - विकास जाधव
खडकाळ जमिनीतही फळबाग, आंतरपिकातून केली शेती यशस्वी
काऊरवाडी-ईजारा (जि. यवतमाळ) येथील शिवशंकर वाटोळे यांची मिश्र शेती ठरली फायद्याची
जमिनीला केले श्रीमंत !
सकस अन्ननिर्मितीचा ध्यास घेणारी सेंद्रिय शेती सकस, दर्जेदार अन्न शेतीतून पिकवण्याच्या दृष्टीने सायने (ता. मालेगाव, जि. नाशिक) येथील जितेंद्र कुटुमुटिया यांनी आपली जमीन सेंद्रिय कर्ब, लाभदायक जिवाणू व सुपीक घटक यांनी श्रीमंत केली आहे.
वनराईचे लेणे ल्यालेली डेरे यांची शाश्‍वत शेती
सुमारे तीस वर्षांच्या प्रयोगांतून रमाकांत डेरे यांची वनशेती चांगलीच बहरली आहे. विविध झाडे, वनस्पतींची संपदा अथक प्रयत्न, अभ्यासातून जोपासत शाश्‍वत शेतीचे उदाहरणच शेतकऱ्यांसमोर ठेवले आहे.
निर्मळ पिंप्री गावाने केली शाश्‍वत विकासाकडे वाटचाल
नगर जिल्ह्यातील नगर-मनमाड हमरस्त्यावरील निर्मळ पिंप्री या जिरायती गावाने बाभळेश्‍वर येथील कृषी विज्ञान केंद्राच्या मदतीने प्रगतीची वाट धरली आहे.
संरक्षित सिंचनातून फुलली शेती आणि जीवनही
सिंचन प्रकल्पाची वानवा असलेल्या विदर्भात संरक्षित सिंचनाचा छोटासा स्रोतही उत्पादकता वाढीचा मोठा पर्याय ठरत आर्थिक स्थैर्याचे निमित्त ठरू शकतो,
"एमबीए' तरुणाने केले डाळिंब शेतीत उत्कृष्ट व्यवस्थापन
एमबीएचे शिक्षण घेतलेल्या राशीन (ता. कर्जत, जि. नगर) येथील बाझील फारुख काझी या ध्येयवेड्या तरुणाने पुणे शहरातील बहुराष्ट्रीय कंपनीतील एचआर विभागातील नोकरी सोडून शिक्षणाचा उपयोग आपली शेती विकसित करण्यासाठी केला.
नैसर्गिक पद्धतीने ऊस पिकवला; त्यापासून दर्जेदार गूळ बनवला
कोल्हापूर जिल्ह्यातील भुयेवाडी (ता. करवीर) हे कोल्हापूर शहरापासून दहा किलोमीटर अंतरावरचे गाव. जिल्हा उसासाठी प्रसिद्ध, साहजिकच गुऱ्हाळांना चांगला वाव.
सण, विशेष दिनांच्या मागणीनुसार दोन हंगामांत घेतली शेवंती
गावातून दिवाळी, दसरा या सणांदरम्यान सुमारे 10 ते 12 टन शेवंती फुले मुंबई व हैदराबाद येथे पाठवली जातात. गावात या फुलपिकातून सुमारे दोन कोटी रुपयांपर्यंत उलाढाल होते.
जिरायती हमीदपूर झाले पॉलिहाऊसचे गाव
नगर तालुक्‍यातील हमीदपूर तसे दुष्काळी गाव. पारंपरिक पिकांवर भर; पण बदलता काळ व शेती यांचा वेध घेत येथील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन पॉलिहाऊस शेतीतून पीकबदल साधला
कष्टांना बचतीची जोड देत सालगडी बनला शेतकरी !
जिरायती शेतीतून फार काही पिकत नव्हते. दोन वेळच्या जेवणाचीही गैरसोय झाली होती.
सलग सहाव्या वर्षी ठेवले मिरचीउत्पादनात चांगले सातत्य
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही नंदुरबार जिल्ह्यातील अवर्षणप्रवण बामळोद येथील दशरथभाई व त्यांचे चिरंजीव कैलासभाई पटेल यांनी मिरचीची शेती उत्कृष्ट व्यवस्थापनातून यशस्वी केली आहे.
कुटुंबाची एकजुटीतून पीक बदल केले यशस्वी
सातारा जिल्ह्यातील गोळेवाडी (ता. कोरेगाव) येथील नानासाहेब व जगन्नाथ दाजीराम गोळे या बंधूंनी प्रतिकूल परिस्थितीत स्ट्रॉबेरी पिकाचे उत्पादन घेतले आहे.
रानमसले नव्हे कांद्याचे मसले !
वाढता उत्पादन खर्च, महागडी खते, कीडनाशके, मजुरांचा तुटवडा आणि बाजारपेठेतील चढ-उतार याचा विचार करता शेती आता एकट्या-दुकट्याची राहिलेली नाही, ती सामूहिक पद्धतीने कसणे गरजेचे आहे.
उसातील आंतरपिकांच्या नियोजनातून वाढवले उत्पन्न
सांगली जिल्ह्यातील उरूण इस्लामपूर (ता. वाळवा) येथील विश्‍वासराव पाटील यांनी ऊस, केळी या पिकांपासून चांगले उत्पादन घेताना, या पिकामध्ये कांदा, हरभरा यासारखी आंतरपिके घेऊन उत्पादनखर्चात बचत केली आहे.
सचिनने केले शेतीतच करिअर
वाशीम जिल्ह्यातील शिरपूर (जैन) येथील सचिन सारडा यांच्यावर पडलेली शेतीची जबाबदारी ते वडिलांइतकीच प्रयोगशीलतेने पार पाडत आहेत.
मोरे यांच्या हरितगृहात दर्जेदार ढोबळी मिरची
तारगाव (ता. कोरेगाव, जि. सातारा) येथील दिलीप बाबासाहेब मोरे हे गेल्या पंधरा वर्षींपासून ढोबळी मिरचीचे यशस्वी उत्पादन घेत आहेत.
काटेकोर व्यवस्थापनातून शेती आणली ऊर्जितावस्थेत
बनगाव (ता. जि. औरंगाबाद) येथील नरहरी बापूराव मुरमे यांनी सालगड्यापासून सुरवात करत फळबाग आणि आंतरपिकांच्या साह्याने आपली शेती ऊर्जितावस्थेत आणली आहे.
प्रयोगशीलतेतून वाढविले ऊस, हरभऱ्याचे उत्पादन
भोसे (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील नरहरी निवृत्ती कुंभार यांनी उपलब्ध पाच एकर शेतीचे योग्य नियोजन करून ऊस आणि हरभरा पिकाचे चांगले उत्पादन मिळविले आहे.
मरकड कुटुंबाने साधली एकात्मिक शेतीतून प्रगती
जालना जिल्ह्यातील खालापुरी (ता. घनसावंगी) येथील प्रदीप लक्ष्मणराव मरकड व त्यांचे बंधू प्रकाश यांनी एकात्मिक पद्धतीचे शेती व्यवस्थापन करून आपल्या शेतीला चांगला आकार दिला आहे.
काटेकोर व्यवस्थापनातून एकरी 80 ते 90 टन ऊस उत्पादनात सातत्य
सांगली जिल्ह्यातील कासेगाव (ता. वाळवा) येथील मोहन दत्तात्रेय पाटील यांनी एकरी 80 ते 90 टन ऊसउत्पादनात कायम सातत्य जोपासण्याचा प्रयत्न केला आहे.
थर्मोकोलच्या पॉटमध्ये फुलली स्ट्रोबेरी
सातारा जिल्ह्यातील भिलार येथील किसन भिलारे यांनी स्ट्रॉबेरी पिकात व्हर्टिकल फार्मिंग म्हणजे मजल्यांची शेती (एकावर एक कुंड्या अशी रचना) असा प्रयोग केला आहे.
तुरची गावात होतोय यशाचा "भाग्योदय"
सांगली जिल्ह्यातील तुरची (ता. तासगाव) येथील भाग्योदय स्वयंसहायता शेती गटाने परिसरात गटशेतीचा नवा पायंडा पाडून वेगळी वाट चोखाळली आहे. एकमेकांच्या आधाराशिवाय शेती किफायतशीर नाही, हे ओळखून त्या मार्गाने गटाने सुरू केलेली वाटचाल स्तुत्य आहे. - श्‍यामराव गावडे
पीक बदलातून "हुमरमळा' प्रगतीच्या वाटेवर
एखाद्या गावाची, तसेच तेथील शेतकऱ्यांची मानसिकता बदलली तर शेतीचे चित्र कसे बदलते, याचे उदाहरण म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हुमरमळा (आढाव) हे गाव. गेल्या चार वर्षांत हे गाव शेती विकासाकडे आश्‍वासकपणे पावले टाकत आहे. - शिवप्रसाद देसाई
शेतीला दिली "रायपनिंग चेंबर'ची जोड
आंबा, केळीची योग्य पिकवण झाली, दराचा लाभ मिळाला. नांदगाव शिंगवे (जि. नगर) येथील प्रयोगशील शेतकरी अतुल अष्टपुत्रे यांनी सुधारित तंत्र, फळबाग लागवडीच्या बरोबरीने बाजारपेठेची गरज ओळखून फळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी रायपनिंग चेंबरची उभारणी केली.
उच्चशिक्षित तरुणांच्या मदतीने आदिवासींनी घडविली प्रगतीची यशोगाथा
ठाणे जिल्ह्यातील आदिवासी शेतकऱ्यांना गटाद्वारे एकत्र आणून सेंद्रिय शेती व त्याची बाजारपेठ सुकर करण्याचे मोफ्का व डॉ. ढवळे ट्रस्ट यांच्या माध्यमातून झालेले प्रयत्न यशस्वी झाले आहेत.
परदेशी भाज्यांची शेती ठरली अल्पभूधारकाला फायदेशीर
कापूसखेड येथील पाटील यांचे उसाच्या पट्ट्यात प्रयोग सांगली जिल्ह्यातील कापूसखेड (ता. वाळवा) येथील रघुनाथ दत्तू पाटील यांची संयुक्त कुटुंबाची केवळ तीन एकर शेती आहे. मात्र थोड्या-थोड्या क्षेत्रांत वेगवेगळ्या परदेशी भाज्यांची (एक्‍सॉटिक) लागवड करून कमी कालावधीत अधिक उत्पन्न वाढविण्याचे प्रयोग त्यांनी सुरू केले आहेत. विशेष म्हणजे उसातही या भाज्यांचे आंतरपीक घेऊन मुख्य पिकातील खर्च कमी केला आहे. - श्‍यामराव गावडे
डेझी पिकाची लागवड कशी करावी ?
पिवळी डेझी (गोल्डन रॉड) या फुलांचे लांब दांडे असतात. दांड्यांवर असंख्य छोट्या, गोल, पिवळसर-हिरव्या कळ्या व नाजूक, छोटी, उमललेली पिवळी फुले असतात. फुलांच्या या दांड्यांना वर्षभर मागणी असते. ही वनस्पती बहुवर्षायू असल्याने वर्षभर फुलांचा सातत्याने पुरवठा करणे शक्‍य आहे. आपल्याकडील हवामानात याची लागवड केव्हाही करता येते. - एस. एम. शेलार, गौडगाव, जि. सोलापूर
कष्टातून उद्योगशीलता जपत हळद प्रक्रियेत घेतली भरारी
अकोला जिल्ह्यात मूर्तिजापूर तालुक्‍यातील माटोडा गावच्या राजेश चोपडे यांनी हळद प्रक्रिया उद्योगात भरारी घेतली आहे.
टोमॅटोची गटशेती ठरली बोररांजणीच्या शेतकऱ्यांना फायदेशीर
जालना जिल्ह्यात बोररांजणी (ता. घनसावंगी) येथील सुमारे वीस शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन टोमॅटोची गटशेती सुरू केली आहे.
उत्कृष्ट व्यवस्थापनच ठरले यशस्वी टोमॅटो शेतीचा पाया
सातारा जिल्ह्यातील जखीणवाडी (ता. कराड) येथील आनंदराव व शिवाजी भानुदास पाटील या दोघा बंधूंनी टोमॅटो पिकातील सातत्यपूर्ण चांगल्या व्यवस्थापनातून शेतीत प्रगतीचा सुगंध निर्माण केला आहे.
शेतकऱ्यांनी स्थापली कंपनी विक्री व्यवस्था केली सक्षम
आज संघटित होऊन एकमेकांना सहकार्य करून शेतकऱ्यांमध्ये आपुलकीची भावना निर्माण करणे गरजेचे झाले आहे.
रसायनांचा वापर कमी करीत हिरालाल पिकवतात दर्जेदार भेंडी
गेल्या दोन ते तीन वर्षांपासून जळगाव जिल्ह्यातील हिरालाल पाटील यांनी आपल्या शेतात रासायनिक खते व कीडनाशके यांचा वापर कमी करण्यास सुरवात केली आहे.
उत्पादनवाढीचे उद्दिष्ट ठेविन केली कपाशीची शेती
शेतीचा व्यासंग जपणाऱ्या वर्धा जिल्ह्यातील तिगावच्या प्रशांत इंगळे यांनी पीक व्यवस्थापन सुधारणेच्या बळावर कापसाची उत्पादकता वाढवण्याचा प्रयत्न केला आहे.
डाळिंब पिकाच्या शेतीतून उंचावला प्रगतीचा आलेख
शेतीला सुधारित तंत्रज्ञानाची जोड दिली तर फायदा होतोच. धोंडेवाडी (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील विष्णू देठे व त्यांच्या दोघा बंधूंनी हे सिद्ध करून दाखवले आहे.
अवघ्या 12 गुंठ्यात फुलवले विविध फुलपिकांतून यश
सातत्य, प्रयोगशीलता आणि वैविध्य या वैशिष्ट्यांमुळे पुणे जिल्ह्यातील शिरोली बुद्रुक येथील राजाराम चौधरी यांनी फूलशेती यशस्वी केली आहे.
द्राक्षबागेवर इटली तंत्रज्ञानाच्या प्लॅस्टिक आच्छादनाचा प्रयोग
हवामान व बाजारपेठ यांचा विचार करून शेतकरी पीक व्यवस्थापन करू लागले आहेत.
समूह प्रात्यक्षिकांद्वारा वाढले हापूस आंब्याचे उत्पादन
सुधारित तंत्रज्ञानामुळे बागायतदारांकडील आंबा पिकाच्या हेक्‍टरी उत्पादकतेत व फळाच्या गुणवत्तेत दीड ते दुपटीने वाढ झाली.
कमी कालावधीची पिके घेत 50 गुंठ्यांत किफायतशीर शेती
विहे (ता. पाटण, जि. सातारा) येथील राजेंद्र देशमुख यांनी केवळ 50 गुंठ्यांतून आर्थिक उत्पन्न वाढविताना कमी कालावधीत येणाऱ्या पिकांचा आधार घेतला आहे.
एकात्मिक पद्धतीचा आदर्श सांगणारी महादेवप्पा यांची शेती
महादेवप्पा बसप्पा त्रिकन्नावार यांचे नाव प्रयोगशील शेतकरी म्हणून घेतले जाते. प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करीत फायद्याची शेती त्यांनी केली आहे.
आमच्या गावात टोमॅटो पिकाची सुरुवात
वांजुलशेत, तालुका अकोले जिल्हा अहमदनगर येथील गावातील लोकांनी टोमॅटोचे पिक घेण्यास कशी सुरवात केली याची माहिती वाळेकर भीमा श्रावण या ग्रामस्थाने दिली आहे.
पारंपारिक पीक पद्धती
सध्याच्या शेती व्यवसायात शेती हे निसर्गातील विविध तत्वांवर आधारित आहे. या आजची सेंद्रिय शेतीही पारंपारिक मुलतत्वांवर आधारलेली आहे. शेतात वापरण्यात येणारे सर्व प्रकारचे सेंद्रिय पदार्थ हे त्याच शेतीवर तयार केल्या जातात.
प्रयोगातही केला जातोय शेतकऱ्यांचा समावेश!
अमेरिकेतील आर्कान्सास विद्यापीठामध्ये शाश्वत स्ट्रॉबेरी उत्पादनासाठी सातत्याने प्रयोग केले जातात. या प्रयोगामध्येही परिसरातील शेतकऱ्यांचे प्रात्यक्षिक, प्रशिक्षण आणि कार्यशाळांचे आयोजन केले जाते.
मुख्य पीक घेऊन राजगिऱ्याचे तीन एकरांत 19 क्विंटल उत्पादन
जालना जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकऱ्याचा प्रयोग जालना जिल्ह्यातील नेर येथील प्रगतशील शेतकरी शिवप्रसाद लालचंद बजाज आपल्या संयुक्त कुटुंबाच्या सुमारे सव्वादोनशे एकरांतील शेतीचे व्यवस्थापन पाहतात.
वकिलाने दिला शेतीला न्याय !
ममुराबाद (जि. जळगाव) येथील ऍड. अरुणकुमार मुंदडा यांनी शेतीमधील अडचणींवर मात करीत विकासाच्या दिशेने पावले टाकली आहेत. वकिली व्यवसाय सांभाळत योग्य पीकनियोजन आणि उत्पादनखर्च कमी करून जिरायती शेतीतूनही किफायतशीर उत्पन्न घेण्याचा त्यांचा सतत प्रयत्न असतो. - जितेंद्र पाटील
नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मुंबईची मिळवली ग्राहक बाजारपेठ
शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन शेती केली व त्याची विक्री व्यवस्थाही तेवढीच मजबूत केली तर आपण पिकवलेल्या मालाला चांगली किंमत आल्याशिवाय राहत नाही.
धडाडीच्या वृत्तीमुळेच यश साधले, केला शेतीविस्तार
वाहनचालक तसेच अन्य किरकोळ व्यवसाय करीत कुटुंबाची उपजीविका भागवत असताना शेतीतील उत्पन्नाची वेळोवेळी बचत केली. टप्प्याटप्प्याने जमीन खरेदी करीत 15 एकरांपर्यंत शेतीचा विस्तार केला.
नंदाताईंनी सुधारित शेती आणि पूरक उद्योगातून वाढविला नफा
ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान अशी सारी क्षेत्र पादाक्रांत करणाऱ्या महिलांनी शेती आणि शेतीपूरक व्यवसायातही आपले स्थान भक्‍कम केले आहे. दोडकी (ता.जि. वाशीम) येथील नंदाताई नानवटे अशाच कर्तबगार महिलांपैकी एक. नंदाताईंनी सुधारित तंत्राने शेती करून पीक उत्पादन वाढविले आहे, त्याचबरोबरीने पॅलेटनिर्मिती व्यवसायातून आर्थिक प्रगती साधली आहे. - विनोद इंगोले
प्रयोगशील वृत्तीतून घडलेली शेळके यांची सुधारित शेती
शेतीची आवड व उत्साह ओसंडून वाहत असेल तर शेतीच्या विकासासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करता येऊ शकते.
शून्यातून उभे केले एकात्मिक शेतीचे मॉडेल
ठाणे जिल्ह्यातील जामशेत येथील पोतदार बंधूंनी एकात्मिक फळ व मसाला शेती केवळ अभ्यास व वडिलांच्या मार्गदर्शनातून पुढे विकसित केली आहे.
सेंद्रिय पद्धतीवर भर देत साधली हळद, आल्यातून समृद्धी
माळसोन्ना (ता. जि. परभणी) येथील प्रयोगशील शेतकरी तुकाराम नारायण दहे यांनी सेंद्रिय शेती पद्धतीवर भर देत हळद व आले पिकातून आपली प्रगती साधली आहे.
गुलाब शेतीने दाखविली प्रगतीची वाट
लातूर जिल्ह्यातील औसा येथील बालाजी माळी यांनी मात्र अभ्यास, ज्ञान घेण्याची आस, कष्ट व पिकांचे नियोजन करण्याची क्‍लृप्ती यातून गुलाबासह फुलशेती त्यांना फायदेशीर ठरली